ठाणे जिल्ह्यातील धबधबे, तलाव, धरणे या ठिकाणी मज्जाव

ठाणे –  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव  ठाणे जिल्हयात असल्याने  सार्वजनिक व खाजगी जागेत एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमांचे आयोजन करणे इत्यादींमुळे या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेच्या  आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने  तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना म्हणून ठाणे जिल्ह्यातील सर्व धबधेब,तलाव या ठिकाणी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे आहे.
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मनाई आदेश जारी केला.
ठाणे जिल्हयामध्ये मान्सुन कालावधीत मोठया संख्येने पर्यटक धबधबे, तलाव तसेच धरणांच्या ठिकाणी येत असतात त्या ठिकाणी जिवितहानी होण्याच्या घटना घडल्या आहेत. ठाणे जिल्हयातील ज्या धबधबे, तलाव किंवा धरणांच्या ठिकाणी पर्यटक मोठया प्रमाणात येतात. अशा ठिकाणी  सामाजिक अंतर पाळणे शक्य नसून कोरोना विषाणूचा संसर्ग होवून प्रसार होण्याची दाट शक्यता निर्माण होते. तसेच पर्यटकांची सुरक्षा अबाधित रहावी व कोणत्याही प्रकारची जिवीतहानी  होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार तसेच साथरोग नियंत्रण कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ३४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन  ठाणे जिल्हयातील खालील तालुका निहाय स्थळांना प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे आहे.

ठाणे तालुक्यातील येऊर धबधबे,सर्व तलाव,कळवा मुंब्रा रेती बंदर,मुंब्रा बायपास येथील सर्व धबधबे गायमुख रेतीबंदर,घोडबंदर रेतीबंदर,उत्तन सागरी किनारा, ही स्थळे आहेत.

मुरबाड तालुक्यातील सिध्दगड डोंगरनाव्हे,सोनाळे गणपती लेणी,हरिश्चंद्रगड,बारवीधरण परिसर,पडाळे डॅम,माळशेत घाटातील सर्व धबधबे,पळू,खोपवली ,गोरखगड,सिंगापुर नानेघाट,धसई डॅम,आंबेटेवे मुरबाड, ही स्थळे आहेत.

शहापूर तालुक्यातील भातसा धरण स्थळ,कुंडन दहीगाव,माहुली किल्ल्याचा पायथा,चेरवली,अशोक धबधबा,खरोड,आजा पर्वत(डोळखांब)सापगांव नदीकिनारी कळंवे नदी किनारा,कसारा येथील सर्व धबधबे ही स्थळे आहेत.

कल्याण तालुक्यातील कांबा पावशेपाडा,खडवली नदी परिसर,टिटवाळा नदी परिसर,गणेश घाट चौपाटी ही स्थळे आहेत.

भिवंडी तालुक्यातील नदीनाका,गणेशपुरी नदी परिसर ही स्थळे आहेत.

अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर,धामणवाडी,तारवाडी,भोज,वऱ्हाडे,दहिवली ,मळीचीवाडी  ही स्थळे आहेत.

पावसामुळे वेगाने वाहणाच्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे. धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्याचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे.पावसामुळे निमार्ण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतुक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघडयावर मद्य सेवन करणे.  वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे. वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे. सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या व थर्माकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर व इतरत्र फेकणे.सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य अश्लील हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.सार्वजनिक ठिकाणी मोठया आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डिजे. सिस्टम वाजविणे, गाडीमधील स्पिकर / उफर वाजविणे व त्यामुळे ध्वनीप्रदुषण करणे.ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती करणे.धबधब्याच्या १ किलोमीटर परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे. (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून)

नमूद केलेल्या ठिकाणी असलेले धबधबे, तलाव किंवा धरणे या ठिकाणांच्या सभोवताली  १  किलोमीटर परीसरात दि. 8 जून 2021  ते पुढील आदेश होईपर्यंत खालील बार्बीकरीता प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील  असे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मनाई कळविले आहे.

 364 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.